श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा यथोचीत सत्कार

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी): येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त तालुक्यातील सर्व पत्रकारांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.  अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक कृष्णा सपाटे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री छत्रपती शिवाजी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक गजानन डमाळे तसेच सेवानिवृत्त शिक्षक रमेश सोनवणे हे होते. 

तालुक्यातील विविध दैनिक तसेच साप्ताहिक यांचे संपादक, बातमीदार यांची उपस्थिती होती. यात सर्वश्री संजय कुलकर्णी, सचिन चौबे, श्यामकुमार पुरे, रवींद्र सोनवणे, प्रशांत क्षीरसागर, निलेश सोनटक्के, प्रकाश वराडे, मन्सूर कादरी, जावेद सौदागर, शिवाजी डापके, सोहेल कादरी, गजानन मरकड, अनिल कुलकर्णी, प्रा. वाकेकर, दत्ता ढोरमारे, दशरथ सुरडकर, योगेश पालोदकर, सय्यद हरून आली, विलास नलावडे, चांद तोशिफ, आजम पठाण, जी. टी. वाघ, बाबा देशमाने, शब्बीर पटेल यांची उपस्थिती होती.

सर्वप्रथम दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून तसेच दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात
आली. प्रास्ताविक व सूत्रसंचालन विद्यालयाचे शिक्षक गजानन दौड यांनी तर आभार प्रदर्शन शिक्षक गणेश चव्हाण यांनी केले, याप्रसंगी पत्रकार मन्सूर कादरी, संजय कुलकर्णी यांनी पत्रकार दिनाचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक कृष्णा सपाटे यांनी अध्यक्षीय समारोप केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे पर्यवेक्षक निशांत म्हस्के, संगीता तायडे, संगीता काळे, मधुकर मगर, लक्ष्मण कोलोड, नरेश सिंग राजपूत, रमेश परदेशी, अंगद काळे, अमोल ताटू, अरविंद सोनवणे, भास्कर सागरे, पंकज सावंत, श्रीमती वडमारे, हर्षदा सानांसे, अमोल दांडगे, राजू गाढवे, भाऊसाहेब गावंडे, अमोल पालोदकर, गणेश सुरडकर यांनी प्रयत्न केले.